कंधार तालुक्यात जुगार अड्डय़ावर धाड
कंधार तालुक्यातील बारूळ येथे सिंचन वसाहतीत जुगार खेळणार्या ७ जणांना प्रभारी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून अटक केली. ८ जुलै रोजी सायंकाळी ही धाड टाकली. तर देगलूर तालुक्यातील मरखेल येथे मटका चालविणार्यास पोलिसांनी अटक केली.
बारूळ येथील सिंचन वसाहतीत ८ जुलै रोजी गोपाळ सखाराम मोरे, बालाजी रावसाहेब वडजे, महादेव शंकर इंगोले, अनिल पिराजी कौराळे, आनंदा गंगाराम देशमुखे, गणेश किशन हिवरे व महादेव शिवराम देशमुख सर्व रा. बारूळ हे झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत होते. यावेळी विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिनेश सोनसकर व त्यांच्या सहकार्यांनी येथे धाड टाकली. या धाडीत रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ६ हजार ७४0 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनसकर यांचया तक्रारीवरून उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
देगलूर तालुक्यातील मरखेल येथे शिवाजी श्रीराम चकलावार याला मटका चालविताना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा २ हजार ८३0 रूपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी जमादार महेबूब जलाल बेग यांच्या तक्रारीवरून मरखेल पोलिसांनी चकलावारविरुद्ध गुन्हा दाखल केला.