गोव्यात सर्वच मंदिरांत ‘ड्रेसकोड’
पणजी, दि. १२ (पीटीआय) - गोव्यात काही दिवसांपूर्वी दोन मोठ्या मंदिरांमध्ये परदेशी नागरिकांना तोकड्या कपड्यांत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता राज्यभरात सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत देवदर्शन घेता येणार नाही. गोव्यातील धार्मिक संघटनांनी राज्यभरातील सर्वच प्रमुख मंदिरांना याबाबत आवाहन केले आहे.
गोमंत मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ या मंदिर प्रशासनांच्या संघटनेने अशाच प्रकारची बंदी राज्यातील सर्व मंदिरांनी घालून देवस्थानांचे पावित्र्य राखावे असे आवाहन केले आहे.