जिल्हा रुग्णालयात एक्स-रे मशीन
येथील जिल्हा रुग्णालयात क्ष-किरण यंत्र नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परभणीत ५00 एम.ए.ची एक्स-रे मशीन उपलब्ध झाली असून ती लवकरच कार्यान्वित होणार आहे.
परभणी येथे ४0६ खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय अशी या रुग्णालयाची ओळख. मात्र या रुग्णालयात एकच ६0 एम.ए.चे येथील एक्स-रे मशीन (क्ष-किरण यंत्र) सुरू होते. त्यामुळे रुग्णांची गैरेसाय होत होती. प्रत्येक महिन्याला जवळपास १२00 ते १३00 रुग्ण एक्स-रे काढण्यासाठी येतात. परंतु, मशीन उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने या रुग्णांना खाजगी केंद्रातून एक्स-रे काढावा लागत असे. त्याचप्रमाणे एकाच एक्स-रे मशीनवर कामाचा ताणही वाढला होता. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही क्ष-किरण यंत्र उपलब्ध होत नव्हते. याची आरोग्य राज्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन परभणीसाठी क्ष-किरण यंत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली होती. राज्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे ५00 एम. ए. चे क्ष-किरण यंत्र प्राप्त झाले असून, ९ जुलै रोजी फौजिया खान यांच्या हस्ते हे यंत्र कार्यान्वित करण्यात आले. १६ लाख रुपये किमतीचे हे यंत्र अद्ययावत सुविधांयुक्त असून, अलेंर्जस कंपनीचा असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लालमन नारोळे यांनी दिली. रुग्णांची गैरसोय दूर होणार