बुलडाण्यात शाळेत ट्रक घुसला, २५ विद्यार्थी जखमी
बुलडाण्यातील पिंपळखेड तालुक्यात एका शाळेत सिमेंटचा ट्रक घुसल्याने झालेल्या विचित्र अपघातात २५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे.
शुक्रवारी दुपारी शाळेत नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होते. शाळेच्या बाजुने जाणा-या सिमेंटचा ट्रक अचानक शाळेत घुसला. या शाळेला भिंत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गात बसलेल्या अंगावर हा ट्रक गेला.
या अपघातानंतर शाळेतील शिक्षक आणि गावक-यांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी १० विद्यार्थी आणि १५ विद्यार्थिनी आहेत. चार जणांची परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. अद्याप अपघाताचे कारण समजू शकलेले नसून, पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.