विद्यार्थ्यांना अपघात कवच

11/07/2011 18:48

 

 

 

विमा कंपन्यांना फाटा; आता शासनच राबविणार योजना
राज्यातील २ कोटी ४४ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

मराठीला खो देणार्‍या शाळांवर कारवाई होणार /२ दिरंगाईला पूर्णविराम
जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून हे दावे निकाली काढण्यात येणार असल्याचे दर्डा यांनी पत्रकारांना सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या समितीने मान्य केलेल्या दाव्याची रक्कम लाभार्थीच्या खात्यात सात दिवसांच्या आत एकरकमी जमा होईल. तसेच, या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करणे, त्या अर्जाची छाननी, तपासणी आणि मंजुरी यासाठी आता कालर्मयादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे दिरंगाईला पूर्णविराम मिळेल आणि अनुदान लवकरात लवकर मिळेल, असा विश्‍वास दर्डा यांनी व्यक्त केला. मुंबई। दि. ११ (विशेष प्रतिनिधी)
असहकाराचा अनुभव लक्षात घेऊन विमा कंपन्यांना बाजूला सारून पहिलीपासून पीजीपर्यंतच्या २ कोटी ४४ लाख विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सरकारने स्वबळावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज ही माहिती दिली.
आधी ही योजना विमा कंपन्यांच्या मार्फत राबविली जात होती. परंतू या कंपन्या विद्यार्थ्यांचे दावे निकाली काढण्याबाबत उदासीन होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर टीका झाली होती. आता विमा कंपन्यांना बाद करण्यात आले आहे. अनुदानामध्ये वाढ
अपघातामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास आधी ५0 हजार रुपयांची मदत त्याच्या कुटुंबाला दिली जात होती. आता ७५ हजार रुपये दिले जातील. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास पूर्वीप्रमाणेच ५0 हजार रुपयांची मदत दिली जाईल. तथापि, अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल तर ३0 हजार रुपयांची मदत दिली जाईल. आधी ही मदत २0 हजार रुपये होती. मराठीला खो देणार्‍या शाळांवर कारवाई होणार /२