रेखीव गणेशमूर्ती उठावदार दिसण्यामागचे कारण म्हणजे मूर्तीवर करण्यात येणारे हिरेजडित नक्षीकाम. सध्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. गिरगावातील श्री सिद्धगणेश कला मंदिरात गणेशमूर्तीच्या मुकुटावर हिरा बसविताना महिला मूर्तिकार दिसत आहे.