७ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने रविवारी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ७ हजार २७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. १0 जुलै रोजी जिल्ह्यातील २१ केंद्रावर परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी ८ हजा २११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७ हजार २७४ म्हणजे ८0 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय परभणीचे प्राचार्य एम.लक्ष्मणन यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा पार पडल्या. दरम्यान, जवाहर नवोदय प्रवेशाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच होत असतात. यावर्षी त्या जुलै महिन्यात घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होता. पुढीलवर्षी फेब्रुवारी महिन्यातच परीक्षा होणार असून त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती प्राचार्य एम. लक्ष्मण यांनी दिली.